रँप मॉडेल जेसिका लालच्या हत्येसाठी दोषी आढळलेल्या मनू शर्माने 'जेसिकाने मद्य सर्व्ह करण्यास नकार दिल्याने हत्या केली नसून 'इतर कारणांसाठी' हत्या केल्याचा दावा सवौच्च न्यायालयात करून खळबळ उडवली आहे.
शर्माच्या जामीन याचिकेदवर वाद-प्रतिवादादरम्यान त्याचे वकील राम जेठमलानी यांची हा मुद्दा मांडला. यानंतर न्यायालयाने आदेश राखून ठेवला. राम जेठमलांनींनी बाजू मांडताना 'जेसिकाने कुणास काहीतरी देण्याचे वचन दिले मात्र तिने ते दिले नाही, मद्य सर्व्ह करण्यास नकार दिल्याने कुणीही कुणाची हत्या करू शकत नाही' असा मुद्दा मांडला.
आपल्याकडे मद्य सहज उपलब्ध होत असताना फक्त मद्य देण्यास नकार दिल्याने हत्या करणे शक्य नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयातही हाच मुद्दा मांडला होता. उच्च न्यायालयाने शर्मास दोन हजार सहा मध्ये जेसिकाच्या हत्येसाठी दोषी ठरवले होते. सवौच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर आदेश राखून ठेवला.
मनू शर्मा कॉंग्रेसनेते विनोद शर्मा यांचे पुत्र असून दक्षिण दिल्लीतील समाजसेविका बीना रमाणी यांच्या रेस्टॉरंटमध्ये मध्यरात्रीस जेसिकाची हत्या केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यास दोषी ठरवले होते. घटना 29-30 एप्रिल, 1999 दिवशी घडली होती.
|