हिमालयीन क्षेत्रात भौगोलिक व राजकीय वर्चस्व राखण्यासाठी तिबेटचे स्थान महत्त्वपूर्ण असल्याने चीन तिबेटवरील कब्जा सोडणे शक्य नसल्याचे अमेरिकन सुरक्षा तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
तिबेटबाबत त्यांचा दृष्टिकोन मूलभूत राष्ट्रीय सुरक्षेचा असून पश्चिम राष्ट्रातील तिबेटच्या समर्थनातील निदर्शनांकडे ते देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेवर हल्ला मानतात. यामुळे चिनी सापळ्यात अडकले आहेत. चीनचे सामंजस्य व विकास दर्शवण्यासाठी ते ऑलिंपिक घेत आहेत.
मात्र राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना तिबेटवर वर्चस्व राखणे आवश्यक असल्याने त्यांचे जनसंपर्क धोरण बारगळले असल्याचे स्ट्राफर यांनी स्पष्ट केले. त्यांच्यामते तिबेट कोंडी फोडण्यासाठी चीनकडे काही मुद्दे आहेत.
तिबेट मुद्दयावरील दबाव मोडून काढण्यासाठी त्यांच्याकडे राजकीय, आर्थिक किंवा लष्करी पर्याय नाही. अमेरिका व इतर देशांना निर्यातीवरच त्यांची आर्थिक घडी बेतलेली आहे. हे लक्षात घेता तिबेटचा मुद्दा चीनला कोंडीत पकडण्यासाठी भक्कम असल्यानेच चीन कोंडीत सापडला आहे.
चीनच्या केंद्रीय प्रशासनावरील वाढत्या दबावामुळे परिस्थिती हाताळणे त्यांच्या हाताबाहेर जाईल काय, हा खरा प्रश्न आहे. मात्र चीन तिबेटवरील ताबा सोडणार नसल्याचे संरक्षण तज्ज्ञांना वाटते.
|