मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मुंबईत तिबेटींचा हल्लाबोल
नरीमन पॉंईंट येथील चिनी दुतावासा समोर ऑलिंपिक ज्योत विरोधात जोरदार निदर्शने करणार्‍या तिबेटी नागरिकांना पोलिसांनी अटक केली.

राजधानी दिल्लीतही काल रात्री पोलिसांनी 25 तिबेटी नागरिकांना अटक केली आहे. ऑलिंपिक ज्योत आज दिल्लीत दाखल झाली आहे. विजयपथ येथून दुपार नंतर ऑलिंपिक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या रॅलीला विरोध करण्यासाठी देशभरातून तिबेटी नागरिक सध्या राजधानीत दाखल झाले असले तरी, जिथे जमेल तिथे याचा विरोध करण्याचा निर्णय तिबेटी नागरिकांनी घेतल्याने मुंबईतील चिनी दूतावासासमोर तिबेटी नागरिकांनी आज जोरदार निदर्शने केली. यानंतर पोलिसांनी सुमारे 50 तिबेटींना अटक केली आहे.
आणखी
स्वातंत्र्याच्या आगीतील दोन ज्योती
मणीपुरमध्ये पारंपरिक संगीताची धून
आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा भांडाफोड
'चीन तिबेटवरील ताबा सोडणे शक्य नाही'
'जेसिकाची हत्या मद्यास नकार दिल्याने नाही'
मेघालय आणि आसामला भूकंपाचे धक्के