महागाईमुळे केंद्रातले कॉग्रेस सरकार कोसळले तरी, भाजप केंद्रात सध्या सरकार बनवण्यात 'इंटरेस्टेड' नसल्याचे मत पक्षाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते वैंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले आहे.
डाव्या पक्षांना भाजपची भिती वाटत असून, सरकार पडल्यावरही भाजप सरकार बनवणार नसल्याचे ते म्हणाले. डाव्या पक्षांना सतत भिती वाटते आहे, की जर त्यांनी केंद्रातील कॉग्रेस सरकारचे समर्थन काढून घेतले तर, लागलीच भाजप सरकार स्थापन करण्याचा दावा करेल. पण यात कोणतेही तथ्य नाही.
सरकार बनवण्यात सध्यातरी आम्हाला रस नसल्याचे नायडू यांनी स्पष्ट केले. डाव्या पक्षांचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन सुरू झाले असून, वाढत्या महागाई विरोधात सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची ताकद त्यांच्यात नसल्याचे नायडू म्हणाले.
|