विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांना आदर व सन्मानाने त्यांच्या मूळ स्थानी पाठवण्यात यावे, यासाठी जम्मू-काश्मीरमधील मुस्लिम दृढसंकल्प आहेत. पंडित समुदायाशिवाय काश्मीर अपूर्ण असल्याची मुस्लिम समुदायाची भावना असल्याने या उदात्त हेतूसाठी एका संस्थेने वाहून घतले आहे.
धार्मिक सद्भभाव व मानवी मूल्यांचा आदर यावर आधारलेली काश्मिरीयत पुनर्प्रस्थापित करण्यासाठी काश्मीरमधील युवकांनी पुढाकार घेतला आहे. काश्मीर खोर्यात अशांततेनंतर काश्मिरीयत नामेषश झाल्यागत झालेली आहे.
संस्थेचे कार्यालय श्रीनगरला आहे. खोर्यातील अल्पसंख्याक व बहुसंख्यांकांचे प्रतिनिधींनी जम्मूत येऊन विस्थापित पंडितांची भेट घेऊन त्यांच्या मूळ ठिकाणी सन्मानाने परतण्याच्या मोहिमेत सहकार्याची मागणी केली. युनायटेड काश्मीरीयत फोरम हे संस्थेचे नांव असून भारत रैना हे अध्यक्ष आहेत.
|