राजस्थानच्या वाळवंटात सध्या मोठ्या प्रमाणावर वादळं निर्माण होत आहेत. यात पाक सीमेतून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी लष्कराने 28 एप्रिल पासून 10 मे दरम्यान 'ऑपरेशन अलर्ट' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या दरम्यान सीमावर्ती भागात गस्त वाढवण्यात येणारच आहे पण, अधिक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार असल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या अधीकार्यांनी स्पष्ट केले आहे.
सुरक्षा दलाच्या सर्वच विभागांचे जवान यात सहगाभी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात या भागात वादळ निर्माण होत असल्याने जवळचे पाहण्यासही त्रास होतो, याचाच फायदा पाकघुसखोर घेण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
|