मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अलाडी अरूणा हत्येप्रकरणी दोघांना मृत्युदंड
भाषा
तामिळनाडूचे माजी कायदामंत्री अलाडी अरूणा हत्येप्रकरणी येथील सत्र न्यायालयाने दोघांना मृत्युदंड तर एकास तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अरूणा व त्यांचे सहकारी यांची डिसेंबर, 2004 मध्ये हत्या करण्यात आली होती.

न्यायमूर्ती के. भास्करण यांनी तिघांना बुधवारी दोषी ठरवले होते. दोषींपैकी एस. बालभुरूगम व अझगार यांस मृत्युदंड तर व्हेलदुराई यांस तीन वर्षाचा सश्रम कारावास ठोठावला. न्यायमूर्तींनी मृत्युदंड ठोठावण्यात आलेल्या दोघांना मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठात अपील करता येईल, हे स्पष्ट केले.

बालमुरूगम व अझगार यांना हत्येचा कट रचल्याप्रकरणी तर व्हेलदुरई यांस शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. न्यायमूर्तीनी बुधवारच्या निर्णयात प्रख्यात शिक्षणमहर्षी एस. ए. राजा यांच्यासहित सहा जणांना आरोपातून मुक्त केले होते. दोषींपैकी दोघांनी आत्महत्या केली तर एक फरार आहे.

अरूणा यांनी डिएमके सरकारमध्ये कायदामंत्री तर एआयएडिएमके पक्षाचे राज्यसभा सदस्य म्हणूनही कार्य केले होते. नेल्लूरनजीक एकतीस डिसेंबर, 2004 मध्ये अरूणा व त्यांचे मित्र पोनराज यांची हत्या करण्यात आली होती.
आणखी
सीमेवर लष्कराचे 'ऑपरेशन अलर्ट'
पंडितांच्या हक्कासाठी मुस्लिम दृढसंकल्प
सरकार बनवण्यात भाजपला 'नो इंटरेस्ट'
मुंबईत तिबेटींचा हल्लाबोल
ज्योतीच्या आगीची राजधानीला धग
मणीपुरमध्ये पारंपरिक संगीताची धून