मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
भारताने दिले पाकला एक लाख व्हिसा
भाषा
भारत-पाक संबंध वृद्धींगत व्हायला सुरूवात झाल्यापासून परस्पर देशात आवागमनासाठी देण्यात येणार्‍या व्हिसामध्येही कमालीची वाढ नोंदवल्या गेली आहे. भारताने एका वर्षात पाकिस्तानी नागरिकांना दिलेल्या व्हिसातूनच ही बाब स्पष्ट होते.

दोन हजार तीन मध्ये पाकिस्तानी नागरिकांना आठ हजार व्हिसा देण्यात आले होते. तेव्हापासून दोन देशांमधील संबंधात सुधारणा नोंदवली गेली त्याप्रमाणे व्हिसाची संख्येने दोन हजार सात मध्ये तब्बल एक लाखाचा आकडा पार केला आहे.

परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. इस्लामाबादेतील भारतीय दूतावासामार्फत संपलेल्या दोन हजार सात या वर्षात तब्बल एक लाख चौदा हजार नऊशे सदतीस व्हिसा देण्यात आले आहेत.
आणखी
पाकिस्तानी तुरूंगात साडेसहाशे भारतीय
अलाडी अरूणा हत्येप्रकरणी दोघांना मृत्युदंड
सीमेवर लष्कराचे 'ऑपरेशन अलर्ट'
पंडितांच्या हक्कासाठी मुस्लिम दृढसंकल्प
सरकार बनवण्यात भाजपला 'नो इंटरेस्ट'
मुंबईत तिबेटींचा हल्लाबोल