भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) दोन सदस्यीय पथकास अंतराळात पाठवण्यासाठीचा अभ्यास पूर्ण केला आहे. चांद्रमोहीम मानवरहितच राहील मात्र मानवी स्पेस फ्लाईटचा अभ्यास पूर्ण करण्यात आला आहे.
पृथ्वीच्या कक्षेत जाऊन सुखरूप परतण्यासाठीचा हा अभ्यास होता. भारत व शेजारच्या देशांसाठी इंडियन रीजनल नॅव्हीगेशन सॅटेलाईट सिस्टिम विकसीत करण्यात येत असून दोन हजारा बारा-तेरा पासून ही प्रणाली कार्यरत होईल. पंतप्रधान कार्यालयातील मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही माहिती दिली.
|