मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
दिल्लीत ऑलिंपिक रॅलीची शांततेत सांगता
भाषा
दिल्लीत विजय चौकातून निघालेली ऑलिंपिक ज्योत ऐतिहासिक इंडिया गेट पर्यंत कोणत्याही अनूचित घटनेवीना शांततापूर्ण व उत्साहाच्या वातावरणात पोहचली. संपूर्ण देशभर तिबेटमध्ये पेटलेल्या अग्निकुंडाची धग जगास जाणवावी यासाठी शांततापूर्ण निदर्शने केल्याने रॅली निर्वेधपणे पार पडावी यासाठी सुमारे सतरा हजार सुरक्षा जवान तैनात करण्यात आले होते.

देशातील विभिन्न क्षेत्रातील मान्यवरांच्या साक्षीने सुरू झालेला ज्योतीचा प्रवास चाळीस ‍मिनिटांनंतर इंडिया गेट येथे पोहचला. मात्र सुरक्षेच्या गराड्यामुळे सामान्यजणांना पूरेपुर आनंद घेता आली नाही. नॉर्थ व साऊथ ब्लॉकपासून सर्वच कार्यालये बंद ठेवण्यात आल्याने राजपथास सुमारे पाच तासापर्यंत लष्करी छावनीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

तैनात करण्यात आलेल्या तीन स्तरीय सुरक्षेत दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दिक्षीत यांनी भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना ज्योत सोपवली. बिजींग ऑलिंपिक आयोजन समितीचे उपाध्यक्ष जियांग यू हेही यावेळी उपस्थित होते.

विभिन्न क्षेत्रातील सुमारे सत्तर मान्यवरांनी ज्योत वाहून नेण्याअगोदर एथलीट मिल्खा सिंग यांना ज्योत वाहण्याचा सन्मान मिळाला. लिएंडर पेस, महेश भूपती, धनराज पिल्ले, के. मल्लेश्वरी, झफर इक्बाल, विल्सन चेरीयन, यासारख्या क्रिडापटूंव्यतिरिक्त चित्रपट अभिनेते आमीर खान, सैफ अली खान यांनही ऑलिंपिक ज्योत रॅलीत सहभाग घेतला.
आणखी
मानव अंतराळ मोहिमेचा अभ्यास पूर्ण
भारताने दिले पाकला एक लाख व्हिसा
पाकिस्तानी तुरूंगात साडेसहाशे भारतीय
अलाडी अरूणा हत्येप्रकरणी दोघांना मृत्युदंड
सीमेवर लष्कराचे 'ऑपरेशन अलर्ट'
पंडितांच्या हक्कासाठी मुस्लिम दृढसंकल्प