सरबजीतच्या नावाने आणखी एक डेथ वॉरंट निघाले असून, त्याला एक मे रोजी फाशी देण्यात येणार असल्याचे वृत्त येऊन थडकताच केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे त्याची फाशी पाक सरकारने पुन्हा एक महिन्यांसाठी टाळली आहे.
चुकून पाक सीमेत प्रवेश केल्यानंतर सरबजीतला पाक सुरक्षा रक्षकांनी अटक केली होती. त्यानंतर त्याच्यावर पाकमध्ये बॉम्बस्फोट केल्याचा ठपका ठेवत पाकमधील न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांनी त्याच्या डेथ वॉरंट स्वाक्षरी करत त्याच्या फाशीची तारीख निश्चित केली होती. जगभरातून त्याला सहानुभूती मिळाल्यानंतर त्याची फाशी 31 एप्रिल पर्यंत टाळण्याचा निर्णय पाक सरकारने घेतला होता.
आता त्याची फाशी पुन्हा एका महिन्यांसाठी टाळण्यात आल्याचे सरबजीतच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे.येत्या 23 तारखेला सरबजीतचे कुटुंबीय त्याला भेटायला पाकमध्ये जात आहेत.
|