मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सरबजीतची फाशी टळली नाही
राष्ट्राध्यक्ष प्रवक्त्याचे स्पष्‍टीकरण
भाषा
आज सकाळी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, लाहोर येथील तुरूंगात कैदेत असलेला भारतीय कैदी सरबजीतसिंग याची फाशी रद्द करण्यात आली. परंतु, या वृत्ताचे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष प्रवक्ता रशिद कुरेशी यांनी खंडन केले असून फाशी रद्द करण्यात आली नसून आणखी एक महिना पुढे ढकलण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानात बॉम्बस्फोट घडवून आणल्याच्या आरोपाखाली सररबजीतला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यावर भारत सरकारने पाक सरकारकडे फाशी माफ करण्यासाठी विनंती केली होती. तेव्हा, मागील महिन्यात राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी सरबजीतची फाशी एक महिन्यासाठी टाळण्याचा आदेश दिला होता.

परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पुन्हा एकदा पाक सरकारला फाशी रद्द करण्याविषयी विनंती केली करताना सरबजीतला मानवतेच्या दृष्टीकोनातून माफ करावे. परंतु, पाक सरकारकडून त्यांच्या विनंतीवर कोणतीही प्रतिक्रिया अजून आलेली नाही.

सरबजीतची फाशी टाळण्यासाठी केवळ राष्ट्राध्यक्षच प्रयत्न करू शकतात. कारण, त्यांना शिक्षा माफ करण्याचा अधिकार असल्याचे वकील राणा अब्दुल हामिद यांनी सांगितले. मानवाधिकार मंत्री अन्सार बर्नी यांनी आपण पुन्हा एकदा नव्याने राष्ट्राध्यक्षांकडे विनंती करणार असल्याचे म्हटले आहे.
आणखी
सरबजीतची फाशी पुन्हा टळली
नेपाळप्रश्नी भारताचा अंदाज अचूक:प्रणव
मायग्रेनने येऊ शकतो 'हार्टऍटॅक'
मधुमेह स्वतः:च तपासणे धोकादायक
ओबीसी आरक्षणातून क्रिमीलेअर बाहेर
अरुणाचलमध्ये चीन विरोधी आंदोलनास बंदी