मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मायावतीचा केंद्राला पुन्हा इशारा
भाषा
उत्तरप्रदेशाच्या विकासासाठी आणि महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी बहुजन समाजवादी पक्षाने (बसपा) मागणी केलेल्या 80 हजार कोटीचे विशेष पॅकेज सरकारने लवकर मंजूर केले नाहीतर बसपा सरकारचा पाठिंबा काढून घेईल, असा इशारा उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी आज सरकारला दिला आहे.

बुंदेलखंड आणि पूर्वांचल या मागासलेल्या भागाचा विकास करण्यासाठी या विशेष पॅकेजची मागणी करण्यात आली असून सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मायावतींनी सरकारवर केला
आहे.

जानेवारी महिन्यात सरकारला ही मागणी मंजूर करण्यासाठी इशारा दिला होता. परंतु, त्याचा काहीही परिणाम केंद्र सरकारवर झाला नसून सरकार मुद्दाम डोळेझाक करत आहे.

आज पुन्हा एकदा इशारा देताना मायावतींनी म्हटले की, आजपासून तीन महिन्याच्या आत पॅकेज मंजूर झाले नाहीतर संपुआ अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रपतींकडे पाठिंबा काढून घेतल्याचे पत्र पाठवून देशव्यापी आंदोलन सुरू केले जाईल.
आणखी
सरबजीतची फाशी टळली नाही
सरबजीतची फाशी पुन्हा टळली
नेपाळप्रश्नी भारताचा अंदाज अचूक:प्रणव
मायग्रेनने येऊ शकतो 'हार्टऍटॅक'
मधुमेह स्वतः:च तपासणे धोकादायक
ओबीसी आरक्षणातून क्रिमीलेअर बाहेर