उत्तरप्रदेशच्या मुख्यंमत्री आणि बहुजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांच्या एका जवळच्या नातेवाईकाने कौंटूबिक वादाला कंटाळून आज धावत्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली.
खुर्जाजवळील मौजपूर गावात मायावतींचे मामा सोहनपाल राहत असुन ते शेतकरी आहेत. त्यांच्या कुटूंबात काही दिवसांपासून मोठा मुलगा जीतू यांच्यात वाद सुरू होता.
त्या वादाला कंटाळून त्याने सकाळी सहा वाजता खुर्जा जंक्शनवर जाऊन आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
|