मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
देशात लवकरच मोबाईल एअरपोर्ट
चेक गणराज्याने केलेल्या नवीन संशोधनाचा फायदा देशातील विमानतळांच्या आधुनिकीकरणासाठी होणार आहे. या अंतर्गत लवकरच देशात मोबाईल विमानतळ बनविण्यात येणार आहे.

केवळ 20 मिनिटांमध्ये एखाद्या ट्रकमध्ये विमानतळ बनविण्यात आपल्या वैज्ञानिकांना यश मिळाल्याचा दावा चेक गणराज्याने केला आहे.

या अंतर्गत मेघालय, आणि पूर्वेकडील राज्यात अशा स्वरूपाचे विमानतळ बनविण्यात येण्याची शक्यता आहे. हायनेक कोमोनिसेक यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात अनेक राज्यांमध्ये चेक गणराज्यांच्या कंपन्यांचा कारभार चालतो. फक्त पूर्वेकडील राज्यात संसाधनांचा अभाव असल्याने तिथे अजूनपर्यंत व्यवसाय वाढवण्यात चेक कंपन्यांना यश मिळाले नाही.

जर भारत सरकारने अशा स्वरूपाच्या विमानतळांना परवानगी दिली तर, लवकरच भारतात मोबाईल विमानतळ बनवण्यात येतील असेही ते म्हणाले.
आणखी
न्यायमंडळातही भ्रष्टाचार- मनमोहन
मायावतींच्या नातेवाईकाची आत्महत्या
मायावतीचा केंद्राला पुन्हा इशारा
सरबजीतची फाशी टळली नाही
सरबजीतची फाशी पुन्हा टळली
नेपाळप्रश्नी भारताचा अंदाज अचूक:प्रणव