मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सरबजीतची फाशी रद्द, पण जन्मठेप?
पाक तुरुंगात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या सर्वच कैद्यांची शिक्षा माफ करत त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी असा प्रस्ताव पाक सरकारने मुशर्रफ यांच्याकडे पाठवल्याने सरबजीतच्या सुटकेची नवीन आशा निर्माण झाली आहे.

सरकारने अशा स्वरूपाचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती सरकारचे सल्लागार मंत्री रहमान मलिक यांनी दिली आहे. मुशर्रफ यांनी हा प्रस्ताव मान्य केल्यास सरबजीतची फाशीही रद्द होऊ शकते. पण सरबजीत याच्या विषयी अशा स्वरूपाची कोणतीही विनंती करण्यात आली नसल्याचेही मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

हा निर्णय आता मुशर्रफ हेच घेऊ शकतात असेही ते म्हणाले. दोन दिवसांपासून पुन्हा सरबजीतच्या फाशी टळल्याच्या बातम्या पाकमधून येत असल्याने सरबजीतच्या सुटकेची आशा निर्माण झाली आहे.

यातच सरबजीतची फाशी तात्पुरती टाळण्यात आली असून, ती रद्द करण्यात आली नसल्याचे मुशर्रफ यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
आणखी
देशात लवकरच मोबाईल एअरपोर्ट
न्यायमंडळातही भ्रष्टाचार- मनमोहन
मायावतींच्या नातेवाईकाची आत्महत्या
मायावतीचा केंद्राला पुन्हा इशारा
सरबजीतची फाशी टळली नाही
सरबजीतची फाशी पुन्हा टळली