चीन सरकारने तिबेटी नागरिकांवर सुरू केलेल्या अत्याचारांचा विश्व हिंदू परिषदेने निषेध केला असून, चीनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणी विहिंपचे अध्यक्ष अशोक सिंघल यांनी केली आहे. भारत सरकारनेही चीनच्या कच्च्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
चीनच्या अत्याचारांनी तिबेटी नागरिकांचे त्यांच्या देशात राहणे मुष्किल झाले असून, भारतात त्यांना समान नागरिक अधिकार देण्यात यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे.
|