बडोद्यात अपघातात 46 मुलांच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच, भावनगरमध्ये दोन अवजड वाहनांचा समोरा समोर झालेल्या अपघातात 10 जण ठार झाले तर 24 जण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रबारी समुदायाचे 50 जण तालाजाच्या पांधरगड गावावरून महुवा तालुक्याच्या डुंडासकडे धार्मिक अनुष्ठान करण्यासाठी जात असताना त्यांची गाडी ट्रकवर समोरून आदळली यात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला.
जखमींना भावनगर आणि महुवाच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
|