भारत पाक फाळणीनंतर जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत तीन लाख जणांना अपंगत्व आले असून, देश भरात हीच संख्या सात कोटीच्या घरात असल्याची माहिती शहर विकास मंत्री तारिक हामिद कर्रा यांनी दिली आहे.
यामागे शारीरिक आणि मानसिक अशांती हेच एकमेव कारण असल्याचे ते म्हणाले. राज्यातील अपंगांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी सरकारने यापूर्वीच अपंग कायदा 1998 नुसार त्यांचे पुर्नवसन करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.
राज्यातील अपंगांना देण्यात येणार्या पेंशनमध्येही राज्य सरकारने 50 रुपये वाढ केली असून, त्यांना दर महिन्याला 200 रुपये दिले जातात.
|