कर्नाटकात विधानसभा निवडणूकीत कॉग्रेस कडून तिकिट न मिळाल्याने नाराज झालेले काही कॉग्रेस मधील दिग्गज नेते लवकरच भाजपत प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री बी येदीयुरप्पा यांनी केला आहे.
कॉग्रेसने नुकतीच 84 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात डावलण्यात आल्याचे काही ज्येष्ठ नेत्यांना वाटते आहे, या कारणामुळे त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली असून, येत्या दोन दिवसांमध्येच भाजपत प्रवेश करणार्या नेत्यांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
|