मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
देशातील 67 लाख रेशनकार्ड रद्द
देशात बनावट रेशनकार्डाचा सुळसुळाट वाढल्याचे मान्य करत गेल्यावर्षात अशा स्वरूपाचे सुमारे 67 लाख 45 हजार 468 रेशनकार्ड रद्द करण्यात आल्याची माहिती खुद्द केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिली.

लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, की ही आकडेवारी चिंताजनक आहे. जुलै 2006 ते 5 मार्च 2008 पर्यंत देशातील असे सर्व बनावट रेशनकार्ड रद्द करण्यात आले आहेत.

यात दिल्लीचा नंबर सर्वात वरचा असल्याचेही ते म्हणाले. एकट्या दिल्लीत सर्वाधिक 14 लाख 62 हजार रेशनकार्ड रद्द करण्यात आले. तर या पाठोपाठ आंध्रप्रदेशात 10 लाख 46 हजार प्रकरणं उघडकीस आली.
आणखी
निवडणूक आयोगाची एसएमएसवर नजर
कर्नाटक कॉग्रेसमध्ये 'खिंडार'?
हॉकी महासचिव ज्योतिकुमारांचा राजीनामा
दिल्लीचे निमंत्रण मुंडेंनी धुडकावले
नोकरशाहीवर पंतप्रधानांचा आसूड
18 भारतीय मच्छीमार पाकच्या ताब्यात