भारतीय हॉकी महासंघाचे सरचिटणीस ज्योतिकुमारन यांनी राष्ट्रीय संघात समावेशासाठी एका खेळाडूकडून लाच घेतल्या प्रकरणी त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
लोकसभा आणि राज्यसभेतही या प्रकरणाचे पडसाद आज दिसून आले त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी सरकारकडे केली आहे. एक सदस्य तर इतके आवेशात आले की त्यांनी ज्योतिकुमार यांना फाशी देण्याची मागणी केली.
देशाचे नाव खराब करणार्या या अधीकार्या विरोधात सरकारला कारवाई करण्याचा कायदेशीर अधीकार नसल्यास सरकारने अशा स्वरुपाचा कायदा करावा आशी मागणीही लोकसभा सदस्यांनी केली आहे.
|