गव्हाचे पीक नासवणारा यूजी 99 नावाचा व्हायरस भारतासह इतर गहू उत्पादन करणार्या देशांसाठी डोकेदुखी बनला आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या खाद्य आणि कृषी विभागाने (एएफओ) भारतासह या देशांना धोक्याचा इशारा दिला आहे. अफ्रिकन जातीच्या या व्हायरसने गव्हाच्या पिकावर रोग पडत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
यमन युगांडा आणि केनीयात सध्या या व्हायरसने धुमाकूळ घातला असून भारतात येण्यापूर्वीच यावर नियंत्रण करण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केल्याची माहिती कृषीमंत्री शरद पवार यांनी दिली आहे.
प्रवाशांचे कपडे आणि हवेच्या माध्यमातूनही याचा प्रसार होण्याची भिती असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
|