ओरीसाचा छोटा धावपटू बुधीया याचे प्रशिक्षक बिरंचीदास यांची हत्या करणारा चगलाने मंगळवारी पोलिसां समोर आत्मसमर्पन केले. गेल्या चार दिवसांपासून तो भोपाळमध्ये लपला होता.
याकामासाठी आपल्याला 10 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याची माहिती यानंतर त्याने पोलिसांना दिली आहे.
14 एप्रिलला ओरीसात बिरंची यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यात ओरीसातील कुख्यात माफिया राजा आचार्यचा हात असल्याची माहिती उघड झाल्यानंतर पोलिसांनी ओरीसात त्याच्या अटकेचे प्रयत्न सुरू केले होते.
यातच मुख्य मारेकरी हा आचार्यचा उजवा हात असलेला चगला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
यानंतर पोलिसांनी चगलाचाही शोध घेण्यास प्रयत्न सुरू केला होता. पण अचानक चगला यानेच पोलिसांसमोर आत्मसमर्पन केल्याने बिरंची यांच्या हत्येची गुढ उकलण्यास मदत होणार आहे.
|