पंतप्रधान मनमोहन सिंह यांना घेऊन रांची वरून दिल्लीला आणणार्या विशेष विमानाचे संकेत मिळताच रडार यंत्रणेने धोक्याची घंटा वाजवल्याने सुरक्षा यंत्रणांना काल चांगलाच घाम फुटला होता.
यानंतर त्यांचे विमान हवेतच चक्क 16 मिनिटं घिरट्या घालत होते. भारतीय विमान प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांचे विमान रडारवर असताना एक छोटी वस्तू त्यांचा पाठलाग करत असल्याचे रडार यंत्रणेच्या ध्यानात आल्यानंतर रडारने धोक्याची घंटा वाजवण्यास सुरुवात केली.
यानंतर पंतप्रधानांच्या विशेष सुरक्षा विभागाने वैमानिकाला धोक्याची सूचना दिली आणि हवेतच उडत रहाण्याची सूचना केली.
कालांतराने ही वस्तू नाहिशी झाल्यानंतर विमान प्राधिकरणाने आणि दिल्ली विमानतळ व्यवस्थापनाने त्वरित सुरक्षीततेचे उपाय करत विमानास धावपट्टीवर उतरण्याची परवानगी दिली. आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
विमानाचा पाठलाग करणारी वस्तू नेमकी काय होती, याचा अद्याप तपास लागला नसून, पीएम कार्यालयानेही यावर काही बोलण्यास नकार दिला आहे.
|