मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
तेलगीला बोचतोय 'मुद्रांक'
मुद्रांक नावाचा येऊ घातलेला मराठी चित्रपट सध्या चांगलाच गाजतो आहे. हा चित्रपट आपल्या जीवनावर आधारीत असल्याने यावर बंदी घालण्याची मागणी मुद्रांक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अब्दूल करीम तेलगी याने केली आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार काल त्याला येरवाडा तुरुंगात मुद्रांक चित्रपट दाखविण्यात आला. या चित्रपटातील पात्रांना अब्दुल वेलगी, मनजित वर्मा, सुनील गोटे, महंमद गुलानी, अशी नावे देण्यात आली आहेत.

या चित्रपटात राखी सावंत, रजा मुराद आणि मिलिंद गुणाजी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट बंडगार्डन पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यावर आणि त्यातील तपासावर आधारीत आहे.

तेलगीला चित्रपट दाखविण्यात आला तेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शक साकीर शेख, निर्माते भगवान सौंगर तसेच तेलगीचे वकील विद्याधर कोसे, एडव्होकेट मिलिंद पवार उपस्थित होते.

तेलगीला चित्रपट दाखविण्यात आल्यावर त्याने या चित्रपटातील पात्र आपल्यावर व आपल्या परिवारावर आधारीत असल्याने यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
आणखी
पंतप्रधानांच्या विमानाचा 'पाठलाग'?
बिरंचीच्या मारेकर्‍याचे आत्मसमर्पण
गहू उत्पादक देशांना व्हायरसची भीती
महागाई रोखण्यासाठी आणखी उपाय
चकमकीत तीन नागा उग्रवादी ठार
ज्योतिकुमारन यांच्यावर कारवाईची मागणी