कर्नाटक कॉंग्रेसने युवा आणि नवीन उमेदवारांना संधी दिल्यामुळे अनेक नेत्यानी बंडखोरी करून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज तत्काळ मागे घ्यावेत, अन्यथा कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार रहा, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
केंद्रीय निवड समितीने नव्वद टक्के उमेदवारांची नावे राज्य निवड समितीकडे आधीच पाठविली असल्यामुळे त्याचा आदर करून बंडखोर उमेदवारांनी आपली माघार घ्यावी. तसेच, अधिकृत कॉंग्रेस उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन कर्नाटक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एम. मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे.
|