अगदी सिनेस्टाईल पद्धतीने येथील व्यापार्यांनी डीआरआयच्या पाच अधीकार्यांचे अपहरण केल्याने खळबळ उडाली होती.
अपहरणकर्त्यांचा पोलिसांनी लवकर शोध लावल्याने या प्रकरणावरील पडदा उघडला गेला.यात पोलिसांनी दोन व्यापार्यांना अटक केली असून, त्यांच्या दोन मुलांचाही या कटात समावेश आहे.
अटक करण्यात आलेल्या व्यापार्यांमध्ये अंकुर भारद्वाज आणि नरेश कुमार या दोघा व्यावसायिकांचा समावेश आहे. राजेश भारद्वाज नामक व्यापार्याची चौकशी करण्यासाठी डीआरआयच्या कोची शाखेचे तीन तर स्थानिक शाखेचे दोन आधीकारी गेले होते.
या दरम्याने त्यांचे अपहरण करण्यात आले. यानंतर पोलिसांना अपहरणकर्त्यांची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना सापळा रचून अटक केली.
|