कॉग्रेसचा अंतर्गत वाद कर्नाटकात आता रस्त्यावर आला आहे.पक्षाचे माजी युवा अध्यक्ष मंजूनाथ यांना तिकीट न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी गुरुवारी पक्षाच्याच कार्यालयापुढे हैदोस घातला.
गोंधळ एवढा वाढला, की पक्षाध्यक्षांना चक्क पोलिसांना पाचारण करावे लागले. यानंतर पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्येही वाद झाला. वाद वाढत असल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला यात दोन कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
|