जम्मूतील गुल भागात आज पहाटे सुरक्षा रक्षकां समवेत झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिदिन या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले.
लेफ्टनंट कर्नल एस डी गोस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा रक्षकांनी या परिसराला वेढा दिला होता. या दरम्यान अबू आणि बाबर हे दोन दहशतवादी ठार झाले.
पंतप्रधान मनमोहन सिंह दोन दिवसीय जम्मू यात्रेसाठी येत असल्याने जम्मूतील सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे.
|