आयपीएल सामन्यांमध्ये चीअरलीडर्सची उपस्थिती सध्या वादाचा विषय बनली आहे. सामन्यांमध्ये अशा स्वरूपाच्या मुलांच्या नृत्याने प्रेक्षकच काय पण खेळाडूंचेही चित्त थार्यावर राहत नाही. असे असताना त्यांच्यावर बंदीची मागणी जोर धरत आहे.
राज्य सरकारनेही सुरुवातीला मुंबईत 27 तारखेला होणार्या सामन्यात चीअरलीडर्सना परवानगी नाकारली होती. आता अचानक सरकारने मुंबईतील सामन्यात नाचण्याला या मुलींना परवानगी दिली असून, त्यांच्यावर पोलिसांचा ची सक्त नजर असणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
त्यांच्या नाचण्यावर भाजपने आक्षेप घेतला असला तरी, राष्ट्रवादीने अशानेच इंटरेस्ट येत असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि तरुण नेतृत्व जितेंद्र आव्हाड यांनी अशा चीअरलीडरांना पाठिंबा दिला असून, त्यांच्या मैदानावरील उपस्थितीने सामन्यात इंटरेस्ट येत असल्याचे म्हटले आहे.
जगातील काही महत्त्वाच्या खेळात अशा स्वरूपाच्या लीडरचा चांगलाच बोलबाला असता तर मग क्रिकेटमध्ये का नको? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
|