मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
केरळवासीयांनी उपसले कोकविरूद्ध अस्त्र
एएनआय
केरळातील प्लाचीमडावासीयांची शीतपेय उद्योग कोका कोला विरूद्धची लढाई सहा वर्षापासून कायम असून पर्यावरण व व्यक्तींवर प्रतिकूल परिणाम करणारा प्रकल्प बंद करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे.

समाजसेविका मेधा पाटकर यांनी या लढ्याचे नेतृत्व सांभाळले असून प्रकल्पामुळे हजारो नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झाल्याचा दावा त्यांनी केला. शीतपेयच हानिकाकारक नसून मोठ्या प्रमाणात भूगर्भातील पाणी उपसल्यामुळे जलसाठे धोक्यात आले आहेत.

यामुळे नागरिकांच्या नैसर्गिक संसाधनांवरील अधिकारावर अधिक्रमण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोका कोला कंपनीने भूगर्भ पातळीचे अतोनात नुकसान केले नसून प्रदूषित व हानिकारक घटकद्रव्य असलेल्या शीतपेयांची विक्री करत असल्याचा आरोप अनेकदा करण्यात आला आहे मा‍त्र कंपनीने याचे आतापर्यंत खंडन केले आहे. केरळ उच्च न्यायालयाने दोन हजार चारमध्ये कोका कोला कंपनीस उत्पादनासाठी पर्यायी साठ्याचा शोध घेण्याचा आदेश दिला होता.
आणखी
'राष्ट्रवादीला' चीअरलीडरमध्ये इंटरेस्ट?
एकताच्या मालिकांवर 'अंकुश' हवा
खेडुतांना हवे शेतकर्‍यांच्या हिताचे सरकार
हिज्बुलचे दोन दहशतवादी ठार
मनमोहन सिंग जम्मूच्या दौर्‍यावर
पाच मे ला वंजारांची नार्को चाचणी