क्षयरोगाने मृत्यूच्या संख्येत घट होऊनही देशात अद्यापही दररोज नऊशे जणांचा क्षय बळी घेत आहे. एकोणवीसशे नव्वदमध्ये बेचाळीस लाखावरून दोन हजार सहामध्ये क्षयाने बळी पडणार्यांची संख्या अठ्ठावीस हजारापर्यंत घसरली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील डॉट्स धोरणाअंतर्गत नव्याने राष्ट्रीय क्षय प्रतिबंध कार्यक्रम राबवण्यात येत आहे. प्रयत्नातील सातत्यामुळे पूर्वीच्या प्रतिदिवशी चौदाशेवरून हे प्रमाण नऊशेपर्यंत आले आहे. नवीन कार्यक्रमाअंर्तगत उपलब्ध सुविधा पोहचण्यासाठी स्वयंसेवी संस्था, खाजगी क्षेत्र व वैद्यकीय महाविद्यालयांना सामावून घेण्यात येत असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री अंबुमणी रामदास यांनी स्पष्ट केले.
|