भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी लोकसभेत दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर स्तुती सुमनांची उधळणं केली.
इंदिरा गांधींनी त्यांच्या काळात पोखरणमध्ये क्षेपणास्त्र चाचणीचा घेतलेला निर्णय देशासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले. त्या काळात आंतरराष्ट्रीय दबाव असताना त्यांनी घेतलेला निर्णय देशाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
1972 साली सप्टेंबर महिन्यात इंदिरा गांधींनी पोखरणमध्ये चाचणी केली होती, यानंतर त्यांचे आपण अभिनंदन केल्याचेही अडवाणी म्हणाले.
भाजपने सत्तेवर आल्यानंतर दुसर्यांदा पोखरण परीक्षण केले तर कॉग्रेसने यावर आक्षेप घेतला असल्याचे अडवाणी यांनी स्पष्ट केले.
|