मुंबईसह महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या उत्तर भारतीयां विरोधात मनसे नेते राज ठाकरे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला संघाने विरोध दर्शवला आहे.
भाषा, प्रांत, आणि जातीच्या आधारावर कोणीही भेदभाव करत असेल तर, त्याला संघ कार्यकर्त्यांनी निरुत्साही करावे असे आदेश संघाच्या पश्चिम क्षेत्राचे प्रमुख अशोक कुकडे यांनी स्वयंसेवकांना दिले आहेत.
राज यांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्या उत्तर भारतीयां विरोधातील आंदोलना बद्दल नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी स्थानिक जनतेत मिसळून एकजूटीने आपले काम करावे असे आवाहनही त्यांनी स्वयंसेवकांना केले.
|