मुस्लिम समुदाय आणि मदरसांचा संबंध दहशतवाद्यांशी जोडण्यात आल्याने नाराज झालेल्या जमीयत उलीमा या संघटनेने आगामी तीन तारखेला मध्यप्रदेशात दहशतवाद विरोधी संमेलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या संमेलनाचे संयोजक साहबजादा अर्ब्दुरशीद खा यांनी दिलेल्या माहितीनुसार जमीयत उलीमाचे अध्यक्ष हजरत मौलाना सैय्यद अरशद मदनी आणि दारल उलुम देवबंदचे अध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत हे संमेलन होणार आहे.
या संमेलनात देशातील विविध संस्था, संघटना आणि विविध धर्माच्या प्रतिनिधींना या संमेलनाचे निमंत्रण देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संमेलनात मध्यप्रदेशचे राज्यपाल बलराम जाखड, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरेश पाचौरी, भाजपचे माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा आदींना आमंत्रीत करण्यात आले आहे.
|