मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
बिजींगहून आरोपाखाली अधिकार्‍याची रवानगी
भाषा
बिजींगमधील भारतीय दूतावासात कार्यरत अधिकार्‍यास चिनी महिलेशी संबंध प्रस्थापित केल्याच्या आरोपाखाली दिल्लीस परत पाठवण्यात आले आहे. मूळचे रिसर्च एनालिसीसी विंग मधील असलेले फर्स्ट सेक्रटरी एम एम शर्मा यांना चिनी शिक्षिकेशी संबंध उघडकीस आल्यानंतर स्थानांनरीत करण्यात आले.

शर्मा हे संवेदनशील अधिकारपदावर असल्याने चिनी महिलेशी त्यांचे कोणत्याप्रकारे संबंध होते, याची चौकशी करण्यासाठी चौकशी करण्यात येत आहे. यामध्ये कोणती संवेदनशील माहितीचे हस्तांतरण झाले काय, याचा तपास करण्यात येईल.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नवतेज सरना यांनी शर्मा यांना त्यांच्या विनंतीवरून स्थानांतरीत करण्यात आल्याचे सांगितले. बिजींगमधील भारतीय दूतावासाीतल अधिकार्‍यांनी शर्मा यांच्या पत्नीची प्रकृती चांगली नसून त्या डायलीसीसवर असल्याचे सांगितले.
आणखी
राजनचा सहकारी रेड्डी चकमकीत ठार
उलीमाचे दहशतवाद विरोधी संमेलन
मणिपूरमध्ये दहा दहशतवादी जेरबंद
निर्बंधांमुळे मतदान कमी होणार- कृष्णा
गांधीवादी निर्मला देशपांडे यांचे निधन
एका मुलामुळे अमिताभने राजकारण सोडले