गुजरात निवडणुकांमध्ये मोदींच्या प्रभावाने कॉग्रेसनेही त्यांच्या कार्यशैलीवर स्तुती सुमनांची उधळणं केली होती. आता नरेंद्र मोदींना कॉग्रेसच्या वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांनी हिटलारची उपाधी देऊ केली आहे.
ब्रिटिश सरकार हिटलर विरोधात कोणते वक्तव्य करत त्याला हिटलर जनतेचा अपमान म्हणत जर्मन जनतेत ब्रिटन सरकार विरोधात विष कालवत असत तसेच काम सध्या गुजरातमध्ये मोदी करत असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री शंकर सिंह वाघेला यांनी केला आहे.
त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत केंद्रीय खाद्यमंत्री सुबोधकांत सहाय आणि पेट्रोलियम मंत्री दिनशा पटेल यांनी मोदींवर तोंडसुख घेतले आहे. या तीनही मंत्र्यांनी गांधीनगरमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मोदींवर जोरदार टीका केली.
|