पाक तुरुंगात गेल्या 19 वर्षांपासून बंद असलेल्या भारतीय नागरिक सरबजीतच्या सुटकेचा प्रयत्न करणारी त्याची बहीण दलबीर कौर यांनी आता भारतीय तुरुंगात कैद असलेल्या पाक कैद्यांच्या सुटकेसाठी एक मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय तुरुंगात 45 पाक कैदी असून, त्यांच्या सुटकेसाठी आपण मोहीम सुरू करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
माझा भाऊ गेल्या अनेक वर्षांपासून पाक तुरुंगात आहे, त्याच्यावर कोसळलेल्या संकटाची मला जाणीव आहे. हीच जाणीव पाक कैद्यांच्या परिवाराची असल्याचे आपल्याला पाकमध्ये गेल्यावर जाणवल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाकचे माजी मानवाधिकार मंत्री अंन्सार बर्नी यांच्याकडून आपल्या प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
|