मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
बिहारची शहरं 'सुंदर' होणार
बिहार सरकारने एका अभिनव योजने अंतर्गत आता राज्यातील महत्त्वाच्या शहरांचे रूप पालटण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजने अंतर्गत राज्य सरकार शहरातील डागडुजी करण्यासाठी 100 कोटी खर्च करणार आहे. राज्याचे नगरविकास मंत्री भोलासिंह यांनी ही माहिती दिली.

या योजने अंतर्गत राज्यातील प्रमुख शहरांमधील रस्त्यांची दुरुस्ती, रस्त्या शेजारील गटारींची डागडुजी, तसेच शहरात बागांची निर्मिती करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

राज्यातील शहराची खेड्यापेक्षाही वाईट अवस्था झाली असून शहर सुशोभीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे स्पष्ट करतानाच यात कोणता आधीकारी काम चुकारपणा करताना दिसून आला तर त्याला कडक शिक्षा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आणखी
पाक कैद्यांसाठी दलबीर यांची मोहीम
लोकसभेतील 32 खासदारांवर कुर्‍हाड
आज भाजपचा देशव्यापी बंद
मोदी हिटलरचा दुसरा अवतार- कॉग्रेस
पुंछमध्ये दारुगोळा जप्त
बिजींगहून आरोपाखाली अधिकार्‍याची रवानगी