कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीत विजयश्री खेचण्याबाबत कॉंग्रेसचे उमेदवार आशावादी असून त्यांनी घरोघरी जाऊन प्रचाराचे तंत्र अवलंबले आहे. बंगळूरनजीकच्या अनेकल येथील कॉंग्रेसचे उमेदवार बी गोपाल विकासाच्या मुद्द्यावर विजयी होण्याबाबात विश्वास व्यक्त करतात.
आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना घराचे वाटप करण्यात आलेले नाही. रस्त्यांची दुर्दुशा झाली आहे. पात्र व्यक्तींना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आलेले नाही. हे मुद्दे लक्षात घेता इतर उमेदवारांना आपण सहज मागे टाकणार असल्याचे ते सांगतात.
|