कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यासाठी सुमारे तीनशे उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहेत. यावेळी आठ जिल्ह्यातून एकोणसत्तर जागांसाठी बावीस मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
शुक्रवारी नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. निवडणुक अर्जाची छाननी पाच मे रोजी होणार असून सात मे पर्यंत अर्ज मागे घेता येईल. बेळगाव, बंगालकोट, बिजापूर, गुलबर्गा, बीदार, गडाग, धारवड व हवेरी जिल्ह्यात एकोणसत्तर जागांसाठी तिसर्या टप्प्यात मतदान होईल.
|