मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
भाजपच्या राष्ट्रव्यापी बंदला संमिश्र प्रतिसाद
भाषा
भारतीय जनता पक्षाने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतवाढीविरूद्ध पुकारलेल्या राष्ट्रव्यापी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पक्षकार्यकर्त्यांनी मानवी साखळ्या उभारण्यासोबतच शांततापूर्ण निदर्शने केली.

सार्वजनिक कार्यालये व वाहतूक सुरळीत सुरू राहल्याने आवश्यक सेवांचे संचलन समाधानकारक राहिले. काही ठिकाणी दगडफेकीच्या तुरळक घटना नोंदवल्या गेल्या. राजधानीत राजघाट येथे व्यापार्‍यांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केल्याने प्रमुख घाऊक बाजारपेठ व किरोकोळ बाजारपेठांमध्ये दुकाने बंद राहिली.

अखिल भारतीय व्यापारी संघटनेनुसार सुमारे पाच लाख व्यापार्‍यांनी बंद मध्ये सहभाग घेतला. भाजपशासीत गुजरात, राजस्थान, उत्तराखंड राज्यांमध्येही बंदला संमिश्र प्रतिसाद राहिला. पक्षकार्यकर्ते व पक्ष समर्थक संघटनांनी धरणे देऊन घोषणाबाजी करून केंद्रावर जीवनावश्यक वस्तूंची किंमतवाढ रोखण्यात अपयशी ठरल्याचा निषेध नोंदवला.

महाराष्ट्रात भाजपच्या कार्यकर्त्यांनी नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, नाशिक़, औरंगाबाद व पुणे येथे मानवी साखळ्या उभारून किंमतवाढीबाबत केंद्राचा निषेध नोंदवला. मात्र आसाम, हिमाचल प्रदेश, मणीपूर येथे दुकाने, बाजार, व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहिल्याने सामान्य जीवन विस्कळीत झाले.

बिहार, जम्मू व काश्मीर, ओरिसा, व उत्तर प्रदेशात बंदला सामान्य प्रतिसाद मिळाला. दक्षिणेत केरळ, पॉंडिचेरी येथे सामान्य जनजीवनास बंदचा फटका बसला. मात्र तमिळनाडूत बंदचा कसलाही प्रभाव जाणवला नाही. कर्नाटकातही बंदला प्रतिसाद लाभला नाही.
आणखी
वृत्तपत्र कर्मचार्‍यांचे पंतप्रधानांना साकडे
कर्नाटकात तिसर्‍या टप्प्यासाठी तीनशे नामांकन
ओबीसी आरक्षणास न्यायालयात आव्हान
कर्नाटकात कॉंग्रेस लढणार विकासाच्या मुद्द्यावर
रेल्वे 'हेल्पलाईन' बनली 'तक्रार' केंद्र
अल्कोहोल उत्पादनात भारताची आघाडी