तब्बल चार दशकांहूनही अधीककाळ पोलिसांनाच काय पण लष्करालाही चकमा देणार्या कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनवर काढण्यात येणार्या चित्रपटात त्याची बायको मुत्तूलक्ष्मी भूमिका साकारणार आहे.
18 अक्टोबर 2004 साली वीरप्पन पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारला गेला होता.यानंतर त्याच्या जीवनावर चित्रपट काढण्याची इच्छा काही निर्मात्यांनी व्यक्त केली असून त्यांनी आपल्याशी संपर्क साधल्याची माहिती मुत्तुलक्ष्मी यांनी दिली आहे. या चित्रपटात आपली भूमिका असावी अशी निर्मात्यांची इच्छा असल्याचा त्यांचा दावा आहे.
भूमिका करण्यास आपण अद्याप होकार दिला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. चित्रपटाचे निर्माते , दिग्दर्शक आणि इतर माहिती देण्यास त्यांनी आत्ताच नकार दिला असून या विषयीचा खुलासा लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
|