मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
प्रसिद्ध तबला वादक किशन महाराज यांचे निधन
बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबला वादक पद्मविभूषण किशन महाराज यांचे काल रात्री एका खाजगी रुग्णालयात निधन झाले, ते 84 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, सुप्रसिद्ध तबला वादक पुरन महाराज आणि तीन मुली आहेत.

तीन सप्टेंबर 1923 साली जन्मलेले किशन महाराज बनारस घराण्याच्या कंठे महाराजांचे शिष्य होते. त्यांच्या योगदाना बद्दल भारत सरकारने त्यांना
1973 साली पद्मश्री आणि त्यानंतर 2002 साली त्यांना पद्मविभूषण देऊन गौरविण्यात आले होते. त्यांना काशी विद्यापीठ आणि रवींद्र विद्यापीठातर्फे डॉक्टरेट ही उपाधीही देण्यात आली होती.

24 ते 28 एप्रिल दरम्यान वाराणसीत सुरू असलेल्या संकट मोचन संगीत समारोहात सरोद वादक अमजद अली खान यांच्या भेटी दरम्यान त्यांना अचानक चक्कर आल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

काल त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी चार वाजता मणिकर्णिका घाटावर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
आणखी
राम मंदिरावर निर्मोहीचा दावा
भाजप आणि कॉग्रेस सोबत आघाडी नाही
चॅटर्जीवर खासदार नाराज
ट्रक अपघातात सात ठार
वीरप्पनची बायको बनणार अभिनेत्री
'राहुल पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत'