मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पंजाबमध्ये गव्हाची रेकॉर्ड विक्री
पंजाबमध्ये गव्हाच्या नवीन पिकाने रेकॉर्ड उत्पादन केल्यानंतर आता गव्हाच्या विक्रीचे सारे रेकॉर्डही पंजाबने मोडले आहेत. आतापर्यंत झालेल्या लिलावात पंजाबमध्ये 92 लाख टन गव्हाची विक्री झाली आहे.

सरकारी संस्था तसेच खाजगी व्यापार्‍यांनी मोठ्या प्रमाणावर उत्सुकता दाखवल्याने पंजाबच्या गव्हाची मागणीही आता वाढली आहे. सरकारने ऐकून 87.65 टन गहू खरेदी केला असून, 90 टन गव्हाची खरेदी करण्याचा आपल्या ध्येयापासून अवघ्या काही टन गव्हाची कमतरता आता सारकारला आहे.

पंजाब सरकारनेही राज्यासाठी 211522 टन गहू खरेदी केला आहे. तर खाजगी व्यापार्‍यांनी 235509 टन गव्हाची खरेदी केली आहे. पेनग्रेनने 1632990 टन, मार्कफ्डेने 2073669 टन, पनसपने 2000372 टन गहू खरेदी केला आहे.

गव्हाच्या खरेदीत फिरोजपूर जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागला असून जिल्ह्याने 1049084 टन गव्हाची खरेदी केली आहे. शेतकर्‍यांना या विक्रीच्या
माध्यमातून आतापर्यंत 8 हजार 500 रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे.
आणखी
कार अपघातात नऊ ठार
प्रसिद्ध तबला वादक किशन महाराज यांचे निधन
राम मंदिरावर निर्मोहीचा दावा
भाजप आणि कॉग्रेस सोबत आघाडी नाही
चॅटर्जीवर खासदार नाराज
ट्रक अपघातात सात ठार