भारतीय जनता पक्ष कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय संपादन करेल, असा आशावाद पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने केंद्राती संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारव विविध मुद्द्यावरून हल्ला चढवला.
शेतकर्यांच्या कर्जमाफीबाबत कॉंग्रेसने अद्यापही विस्तुत टिपणी केली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. कर्जमाफी योजनेच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिह्न निर्माण करून देशातील कर्जबाजारी शेतकर्यात विश्वास व आशावाद निर्माण करण्यात योजना अपयशी ठरल्याचे सांगितले.
कर्नाटकात दोनशे चोवीस जागांसाठी दहा, सोळा व वीस मे रोजी तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी उडवताना आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यास सुरूवात केली आहे.
|