रिलायंस इंडस्ट्रीजच्या अनिल अंबानी यांच्या स्वप्नातल्या घराला ते बांधून तयार होण्यापूर्वीच सुरुंग लावणार्या महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे प्रमुख आणि अंबानी यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दावा दाखल करणार्या ए आर शेख यांची सरकारने बदली केली आहे.
त्यांना त्यांचे पूर्वीचेच म्हणजे ग्रामीण विकास खाते देण्यात आले आहे. अंबानी यांना ज्या जागेवर आपले स्वप्नातले घर उभे करायचे आहे, ही जागा वक्फ बोर्डाची असून, ती परत मिळावी अशी शेख यांनी मागणी केली होती.
अंबानींनी याला नकार दिल्यानंतर त्यांनी न्यायालयाकडे धाव घेतली होती. यानंतर त्यांची बदली करण्यात आली आहे. 2006 साली शेख यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती करण्यात आली होती.
|