कर्नाटकात कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने सत्तेची चव चाखणार्या धर्मनिरपेक्ष जनता दलाने विधानसभा निवडणुकीनंतर या पक्षांसोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
धरमसिंग यांच्या नेतृत्वातील कॉंग्रेस सरकारला व भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेचा प्रयोग करून बघितल्याने पुनरारूक्ती शक्य नसल्याचे पक्षाचे सर्वेसर्वा एच डी देवेगौडा यांनी सांगितले. विधानसभेसाठी पक्षाचा निवडणुक जाहीरनामा जाहीर केल्यानंतर त्यांनी कॉंग्रेस व भाजपवर तोफ डागली.
|