24 एप्रिल रोजी अध्यक्षां पुढील हौदात येऊन त्यांचा निषेध करणार्या आणि लोसभेच्या कामकाजात व्यत्येय आणणार्या 32 खासदारां विरोधातील तक्रार लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनी आज अखेर मागे घेतली.
लोकसभा सदस्यांनी यापुढील काळात संसदेचा सन्मान राखावा असा सल्लाही त्यांनी दिला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवट अध्यक्षांनी या खासदारांवरील आपली तक्रार मागे घेऊन केला.
लोकसभेच्या कामकाजात असंसदीय व्यवहार केल्याप्रकरणी 32 खासदारांना लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनी नोटीस पाठवल्याने खळबळ उडाली होती. यात विरोधी पक्षांच्या खासदारांची संख्या अधिक आहे.
या सर्वांचे प्रकरण चौकशीसाठी विशेषाधीकार समितीकडे पाठवण्यात आले होते. संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर खासदारांना त्यांच्या व्यवहारासाठी नोटीस पाठवण्यात आली होती.
24 एप्रिल नंतर खासदारांनी महागाई विरोधात संसदेत केलेल्या गोंधळाने व्यथित झालेल्या चॅटर्जी यांनी यानंतर हा निर्णय घेत 32 खासदारांना नोटीस पाठवली.
यात भाजपचे शहनवाज हुसेन, सेनेचे चंद्रकांत खौरे, कल्पना नरहिरे, अकाली दलाचे रतनसिंह अजनाला, सुखदेव सिंह लिब्रा, पी एस गढवी, किरण माहेश्वरी, फग्गनसिंह कुलस्ते, अशोक प्रधान, श्रीचंद कृपलानी आदींसह 32 खासदारांचा समावेश होते.
|